Lebonon Ground Report : इस्त्रायलनं एअर स्ट्राईक केलेल्या ठिकाणी एबीपी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट
Lebonon Ground Report : इस्त्रायलनं एअर स्ट्राईक केलेल्या ठिकाणी एबीपी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट
आशिया खंडातील आखाती प्रदेशातील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. हिजबुल्लाह (Hezbollah) या संघटनेला समूळ नष्ट करण्याचा इस्रायलने प्रण केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून इस्रायलने आपले सैन्य लेबनॉनमध्ये घुसवले आहे. तर दुसरीकडे लेबनॉनच्या संरक्षणासाठी इराण देश पुढे आला आहे. इराणने मंगळवारी (1 ऑक्टोबर) इस्त्रायलवर थेट 180 क्षेपणास्त्र डागली. त्यानंतर आता आखाती प्रदेशातील स्थिती जास्तच चिंताजनक झाली आहे. इस्रायलकडून लेबनॉनवरील हल्ला आणखी तीव्र करण्यात आला आहे. कोणत्याही क्षणी युद्ध भडकण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत एबीपी न्यूज थेट युद्धभूमीवरून पोहोचले आहे. लेबनॉनमध्ये घडत असलेल्या घटनांचे इत्यंभूत वृत्त जगविंदर पटियाल देत आहेत.
अनेक इमारती जमीनदोस्त, सगळा परिसर बेचिराख
पटियाल सध्या ग्राऊंड झिरोवरून रिपोर्टिंग करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिणी बेरूत या भागात इस्रायलने हल्ले केले आहेत. याच भागात सैफीद्दीन याला कंठस्नान घालण्यात आलंय. या हल्ल्यानंतर साधारण 15-20 मिनिटांनंतरदेखील या भागात पोलीस किंवा वैद्यकीय मदत पोहोचलेली नव्हती. इस्रायलकडून सर्वप्रथम हिजबुल्लाहच्या तळांना लक्ष्य केलं जातंय. इस्रायलने दक्षिण बेरुतमधील ज्या भागाला लक्ष्य केलंय त्या भागात लोकवस्ती आहे. मात्र इस्रायलकडून केले जाणारे हल्ले लक्षात घेऊन या भागातील सामान्यांना हलवण्यात आले होते.