India Pak Border Last Village : भारत-पाकिस्तान सीमेवरील शेवटच्या गावात 'एबीपी माझा'
India Pak Border Last Village : भारत-पाकिस्तान सीमेवरील शेवटच्या गावात
एलओसीवर हेवी आर्टिलरी, रडार सिस्टीम तैनात
दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी भारताचा प्लॅन
भारताच्या युद्धसज्जतेमुळे पाकिस्तानला फुटला घाम
भारत-पाक सीमेवरील ग्राऊंड झीरोवर 'माझा'
आठ दिवसांपूर्वी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तानच्या सीमा भागात भीती आणि दहशतीचे वातावरण आहे.. सध्या परिस्थिती अशी आहे की, पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या मशिदींमध्ये नमाज पठण बंद आहे...
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरील, आरएस पुरा सेक्टरमधील शेवटचे गाव असलेल्या सुचेतगडमध्ये, भारतीय नागरिक आंतरराष्ट्रीय सीमेवर शेतात व्यस्त आहेत.. तर पाकिस्तानच्या बाजूला शांतता आहे.. त्यांच्या शेतीचा परिसर ओसाड झालाय.. आणि भारत पाकिस्तान सीमेवरील याच शेवटच्या गावातून एक्स्क्लुझिव्ह आढावा घेतलाय, एबीपी नेटवर्क प्रतिनिधी अजय बाचलू यांनी..'एबीपी माझा'
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 30 April 2025
पहलगाम हल्ल्याविरोधात कारवाईसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय झाला याची उत्सुकता, थोड्याच वेळात केंद्राची पत्रकार परिषद.
एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसरनमध्ये दाखल, प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे एनआयए घटनास्थळाचे 3D मॅपिंग करणार, घटनेवेळी उपस्थित सर्व ४०० जणांच्या संपर्कात एनआयएचं पथक
एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या सुरू झाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा, पाकिस्तानची उडाली झोप























