(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Washim : मंगरुळपीर नगरपालिका इमारतीवरील नाव पुसल्याने तणाव, पोलिसांची मध्यस्थी
वाशिममधील मंगरुळपीर नगरपालिका इमारतीवरील उर्दू भाषेत लिहिलेलं नगरपालिकेचं नाव पुसल्याने सध्या मंगरुळपीरमध्ये तणावाचं वातारण आहे....नगरपालिकेच्या इमारतीवर गेल्या अनेक दशकापासून मराठीसह उर्दू भाषेत नगरपालिका मंगरुळपीर असा दर्शनीय भागावर उल्लेख आहे. मात्र नगरपालिकेचं नाव हे फक्त राजभाषेत असावं या मागणीसाठी मंगरूळपीर येथील तहसील कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सतीश हिवरकरसह काही कार्यकर्ते उपोषणास बसले होते. दरम्यान नगरपालिका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत उर्दूसह मराठी भाषेतील नावं पांढरा रंग मारून झाकण्याचा प्रयत्न केला..
यानंतर विशिष्ट समाजाच्या जमावाने केमिकलने झाकलेला बोर्ड धुवून काढला त्यामुळे काही काळ शहरात तणाव निर्माण झाला.
दरम्यान मंगरूळपीर पोलिसांना माहिती मिळताच नगर पालिका परिसरातील जमाव पांगवला... रात्री उशिरापर्यन्त विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समाजाच्या नागरिकांना एकत्र घेऊन पोलिसांनी प्रकरण शांततेत मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोडगा काही निघाला नाही.