IND vs NZ ODI Series : 147, 124, 113, 108… आकडे बोलतायत, पाच सामन्यात 4 शतके, तरीही टीम इंडियाचे दरवाजे बंद; देवदत्त पडिक्कलवर अन्याय का?
India Squad for ODI Series vs New Zealand : टीम इंडियात श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांची पुनरागमन झाले असले, तरीही पुन्हा एकदा देवदत्त पडिक्कलला डावलण्यात आले आहे.

Why Devdutt Padikkal Not in India Squad vs NZ ODI Series : न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज यांची पुनरागमन झाले असले, तरीही पुन्हा एकदा देवदत्त पडिक्कलला डावलण्यात आले आहे. सध्या प्रचंड फॉर्ममध्ये असलेला हा डावखुरा फलंदाज निवड समितीच्या यादीत स्थान मिळवू शकलेला नाही. चालू विजय हजारे ट्रॉफीमध्ये पडिक्कलने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आहे. 5 पैकी 4 सामन्यात त्याने शतके झळकावली आहेत. 147, 124, 22, 113 आणि 108... तरीसुद्धा त्याच्या नावावर निवड समितीने शिक्कामोर्तब केलेले नाही, हे अनेकांना आश्चर्यचकित करणारे आहे.
विजय हजारेपूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही पडिक्कलने आपली छाप पाडली होती. तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात त्याने दमदार शतक झळकावले होते. त्याच्या शेवटच्या 10 डावांकडे पाहिले, तर त्यात तब्बल 5 शतके आहेत, तर 7 वेळा तो 50 पेक्षा अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. एवढा भन्नाट फॉर्म असूनही त्याला संघाबाहेर बसावे लागले आहे.
Watch 📽️
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 3, 2026
Rampant Devdutt Padikkal's excellent knock of 108(120) against Tripura 👌
His 4th 💯 in 5 matches in this #VijayHazareTrophy so far 🔥@IDFCFIRSTBank pic.twitter.com/YpEZzYHQZh
देवदत्त पडिक्कलने जुलै 2021 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये संधी मिळाली. मात्र, एकदिवसीय पदार्पणाची संधी अजूनही त्याच्या वाट्याला आलेली नाही. आतापर्यंत त्याने भारतासाठी केवळ 2 कसोटी आणि 2 टी-20 सामने खेळले आहेत.
देवदत्त पडिक्कलवर अन्याय का?
पडिक्कलच्या लिस्ट-ए कारकिर्दीवर नजर टाकली, तर 37 सामन्यांत त्याने 82.56 च्या जबरदस्त सरासरीने 2477 धावा केल्या आहेत. यात 12 शतके आणि 12 अर्धशतके यांचा समावेश आहे. सध्या वनडेमध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही जोडी डावाची सुरुवात करत आहे. रोहित शर्मा वनडेमधून निवृत्त झाल्यानंतर टॉप ऑर्डरमध्ये यशस्वी जैस्वालची जागा जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळेच टॉप ऑर्डर फलंदाज असलेल्या पडिक्कलसाठी सध्या संघात जागा तयार होताना दिसत नाही.
- Hundred in first match.
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2026
- Hundred in second match.
- Hundred in fourth match.
- Hundred in fifth match.
DEVDUTT PADIKKAL IS RULING INDIAN DOMESTIC CRICKET 👑
He has 13 Hundreds & 12 Fifties from 37 Innings in List A Cricket. pic.twitter.com/ClXyuYKMeH
सरफराज खानलाही संधी नाही...
संघनिवडीआधी माजी भारतीय कर्णधार आणि माजी मुख्य निवडकर्ता दिलीप वेंगसरकर यांनी सरफराज खानला कोणत्याही फॉरमॅटमध्ये संधी न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. एका मुलाखतीत ते म्हणाले, “सरफराज खानला टीम इंडियाच्या कुठल्याही फॉरमॅटमध्ये स्थान कसे मिळत नाही, हे मला समजत नाही. धर्मशालामध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात मी सरफराज आणि देवदत्त पडिक्कलला एकत्र फलंदाजी करताना पाहिले आहे. दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी केली, महत्त्वाची भागीदारी उभारली आणि त्यामुळेच भारताला कसोटीत विजय मिळवता आला.” प्रचंड फॉर्म, मजबूत आकडेवारी आणि तज्ज्ञांची पाठराखण असूनही देवदत्त पडिक्कल आणि सरफराज खान यांना सातत्याने डावलले जात असल्याने निवड समितीच्या धोरणांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हे ही वाचा -





















