Dombivali : गळ्यात टाळ घालत मनसे आमदार राजू पाटलांनी वारकऱ्यांसोबत रिंगणात धरला फेर
मनसे आमदार राजू पाटील हे वारकऱ्यांसोबत हरिनामाचा जप करत रिंगणात सहभागी झाल्याचं आज पाहायला मिळालं. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात आयोजित हरिनाम सप्ताहाला आमदार पाटील यांनी उपस्थिती राखली होती. ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अंबरनाथ तालुक्यातल्या कुंभार्ली गावात गेल्या १४ वर्षांपासून वसुधैव कुटुम्बकम पिठाकडून रामकृष्ण हरीजप सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री हे अनेक वर्षांपासून या ठिकाणी तरुणांना आध्यात्माचे विनामूल्य धडे देतात. आचार्य प्रल्हाद महाराज, हभप अजय महाराज पाटील यांच्यासह राजू पाटील यांनीही गळ्यात टाळ घालून, मुखानं हरिनामाचा गजर करत रिंगणात फेर धरला. त्यामुळं वारकऱ्यांचाही उत्साह वाढलेला दिसला.























