(Source: ECI / CVoter)
Thane : तरुणीचा अंगावर कार घालून हत्येचा प्रयत्न, तरुणीच्या अंगावर घातली रेंज रोव्हर डिफेंडर कार
तुमचा विश्वास बसणार नाही इतकी धक्कादायक घटना आज ठाणे शहरात घडली आहे. अश्वजीत गायकवाड या ३४ वर्षांच्या तरुणानं त्याच्या प्रेयसीला कारखाली चिरडून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचं म्हणजे अश्वजीत हा MSRDC चे सह-संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा आहे. प्रिया सिंग असं त्या महिलेचं नाव आहे. अश्वजीत आणि प्रिया यांच्यामध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. पण आपण विवाहित आहोत हे सत्य त्यानं प्रियापासून दडवून ठेवलं होतं. सोमवारी रात्री तिला हे सत्य कळलं. तिनं अश्वजीतला अनेकदा कॉल केला, पण तो फोन घेत नव्हता. अखेर त्यानं फोन उचलला, आणि घोडबंदर रोडवरील ओवळा भागातल्या कोर्टयार्ड हॉटेलजवळ तिला बोलावलं. प्रिया तिथे गेल्यावर त्यांच्यात भांडण झालं आणि रागाच्या भरात अश्वजीतनं त्याचा ड्रायव्हर सागरला प्रियावर गाडी घालायला सांगितलं. सागरनंही त्याचं ऐकलं आणि भलीमोठी रेंज रोव्हर डिफेन्डर गाडी त्यानं तिच्या अंगावर घातली. त्यानंतर प्रियाला जखमी अवस्थेत सोडून आरोपी तिथून पळून गेले.