एक्स्प्लोर
Vikram Lander | विक्रम लॅण्डरचे अवशेष सापडले, भारतीय इंजिनिअरची नासाला मदत | ABP Majha
इस्रोच्या महत्वाकांक्षी 'चांद्रयान 2'च्या विक्रम लँडरचा अमेरिकेच्या नासाने शोध लावला आहे. चांद्रयानाच्या विक्रम लँडरचे तुकडे सापडल्याची माहिती नासाने ट्विटरवरून दिली आहे. नासा मून या त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विक्रम लँडरच्या तुकड्यांचे फोटो ट्विट करण्यात आले आहे. विक्रम लँडरचा शोध लावण्यात भारतीय अभियंता शान उर्फ षण्मुगा सुब्रमण्यम यांनी नासाची मदत केली आहे. त्यासंदर्भात नासाने त्यांचे आभार मानले आहे. 7 सप्टेंबरला इस्रोचा विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता.
आणखी पाहा























