काहींना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल,राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला
काहींना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल, राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवार यांनी असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. ते म्हणाले हे संकट देशावरचं आहे, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने याच्याशी एकत्रित लढलं पाहिजे. नागरिकांवरील हे संकट सोडवण्यासाठी सर्वांची मदत लागेल. राम मंदिराबद्दल बोलताना ते म्हणाले, कोणत्या गोष्टीला महत्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे, आम्हाला वाटत की कोरोना संपवला पाहिजे तर काही लोकांना वाटत की मंदिर बांधून कोरोना जाईल, लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि आमचे सहकारी खासदार आहेत ते दिल्लीत जाऊन प्रश्न मांडतील असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.























