Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवात
Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवात
सोलापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणूकांना सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी 1143 मंडळानी गणरायाची प्रतिष्ठापना केलेली होती. त्यातील 191 मंडळ मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळतर्फे लेझिम खेळला जातोय. हजारो तरुण या लेझिम मध्ये सहभागी झालेत. हलगी, संबळ, ताशा, ढोल अशा पारंपरिक वाद्यवर लेझिम सुरु आहे.
---
Ganesh Visarjan 2024 : घरोघरी, मंडळांत लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर आज 10 दिवसांनी गणरायाचं विसर्जन होणार आहे. सनातन धर्मानुसार, अनंत चतुर्दशी (Ganesh Visarjan) तिथीला फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आज विश्वकर्मा पूजा देखील आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. या दिवशी अनेक भक्त उपवास धरतात आणि बाप्पाचं विसर्जन करतात. मात्र, गणपतीचं विसर्जन कराता काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठीच आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय करावं आणि काय करु नये हे जाणून घेऊयात.
गणेश विसर्जनाच्या दिवशी काय करु नये?
- सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गणेश विसर्जनाच्या दिवशी बाप्पाची मूर्ती घेऊन जाताना योग्य दिशेची काळजी घेणं गरजेचं आहे. यामध्ये गणपतीचं मुख घराच्या दिशेने तर मूर्तीची पाठ घराच्या बाहेर असमं गरजेचं आहे. असं म्हणतात की, गणपतीची मूर्ती घेऊन जाताना जर पाठ घराच्या दिशेने असेल तर दारिद्र्याचा सामना करावा लागू शकतो.तसेच, घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो.
- जर, गणेश विसर्जनाच्या दिवशी तुम्ही घरी बाप्पासाठी नैवेद्य तयार करत असाल तर नैवेद्यात लसूण किंवा कांद्याचा वापर करु नका. नैवेद्यात सात्विक भोजनच दाखवा.
- जर तुम्ही घरीच गणपती विसर्जन करणार असाल तर मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर विसर्जनाचं पाणी आणि मूर्तीच्या मातीला फेकून देऊ नका. विसर्जनाच्या पाण्याला तुम्ही झाडा-झुडुपांत टाकू शकता.तसेच, झाडाचं रोप लावताना तुम्ही मातीचा वापर करु शकता.
- गणेश विसर्जनाच्या दिवशी मांसाहारी पदार्थांचं सेवन करु नये. तर, या दिवशी सात्विक भोजनाचं सेवन करावं. अन्यथा देव नाराज होऊ शकतात.