(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हान
पंढरपूर - राज्यातील राजकारणात अजून एका पुतण्याने थोपटले काका विरुद्ध दंड , साहेबानी तिकीट दिल्यावर समोर कोण आहे हा विचार नाही .. आमदार बबनदादा शिंदे याना पुतण्या धनराज कडून आव्हान
राज्यातील राजकारणात काका आणि पुतण्या या नात्यातील प्रेम नेहमीच समोर येत आले आहे . मग ठाकरे किंवा पवार यांच्या सारखी मोठी कुटुंब असोत किंवा आमदार खासदाराचे कुटुंब असो , कायम पुतण्या हा काकाच्या विरोधात जातानाची अनेक उदाहरणे दिसत असतात . तसेच एक उदाहरण आता समोर आले असून माढा तालुक्याचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी दंड थोपटले असून मी बंद उशिरा केले पण मतदारांनी लोकसभेलाच केल्याचा टोलाही त्याने लगावला आहे .
माढ्याचे सलग सहा टर्म आमदार असणाऱ्या बबनदादा शिंदे याना जिल्ह्यात कायम पर्मनंट आमदार या नावाने ओळखले जाते .प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढत जाते असा अनुभव असणाऱ्या आमदार शिंदे याना त्यांच्या लहान भावाचा मुलगा धनराज रमेश शिंदे यांनी आता आवाहन देत बंडाचा झेंडा हाती घेतला आहे . आजवर आमदार शिंदे यांचे निवडणुकीतील महत्वाची जबाबदारी त्यांचे धाकटे बंधू रमेश मालक शिंदे हे पाहत होते . मात्र गेल्या काही महिन्यापासून शिंदे कुटुंबात वादाचे खटके उडत गेले . त्याला कारणही हाच धनराज होता . गेल्या पंचायत समितीला त्याचे तिकीट कापण्याचा प्रयत्न झाला मात्र तरीही तो उभारून निवडून आला . त्यानंतर सभापती पदाची निवड करतानाही त्याला डावलण्यात आल्याने धनराज व त्याचे कुटुंब नाराज होते .
आज माढा तालुक्यातील मानेगाव येथील सभेत त्याने आपण निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करताना शरद पवार यांनी आपणास उमेदवारीचे आश्वासन दिल्याचे सांगितले . काका बबनदादा हे पुत्र प्रेमामुळे आंधळे झाल्याने त्यांनी राजकीय सन्यास घेऊन मुलाला उमेदवारी दिल्याचा टोला लागवला . आपण रणजित शिंदे याच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले . मात्र ऐनवेळी जात काका बबनदादा शिंदे रिंगणात आले तरी पवार साहेबाना एकदा शब्द दिला कि उमेदवारी मिळाल्यावर समोर कोण आहे याचा विचार नसल्याचे सांगत थेट आव्हान दिले . मी बंडाला उशीर केला असला तरी तालुक्यातील जनतेने त्यांच्या विरोधात लोकसभा मतदानाच्यावेळीच बंड केल्याचे सांगतात आम्हाला साखर कारखानदार आमदार नको आहे अशी जनतेची भूमिका असल्याचे सांगितले . मी कायम शरद पवार यांच्या सोबत राहिलो असून पंचायत समिती सदस्य देखील त्यांच्याच पक्षातून झालो . नंतर मी कधीही भाजप , सेने किंवा अजितदादा यांच्या स्टेजवर गेलो नाही ना माझे यातील कोणत्या नेत्यांसोबत फोटो आहेत असे धनराज शिंदे यांनी सांगितले . हा निर्णय मोकळ्या मानाने घेतल्यानेच आज मला दडपण जाऊन मोकळे मोकळे वाटत असल्याचा टोला लगावला .