Sangli Rain krishna River Water Level : कृष्णा नदीची पाणी 25 पातळी फुटांवर, गावांना सतर्कतेचा इशारा
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात ठिकठिकाणी देण्यात आलेल्या मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.
पालघर जिल्ह्यात पावसाने सलग चार दिवस दमदार हजेरी लावली. आज पाचव्या दिवशीही पावसाची रिमझिम सुरूच असून रविवारी, डहाणू शहरामध्ये सर्वाधिक 315 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर तलासरी तालुक्यालाही पावसाने झोडपून काढलं. तर तलासरी तालुक्यातील कोमगाव येथून वाहणाऱ्या गावघात नदीला पूर आल्यामुळे या पुरात एक महिला वाहून गेल्याची घटना घडली आहे. सूर्या आणि वैतरणा नद्यांनाही मोठा पूर आला आहे. तर दुसरीकडे सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण 58 टक्के भरलं असून जिल्ह्यातील इतर लहान धरण ही 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.
भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पवनी तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे आसगावातील अनेक घरांमध्ये हे पावसाचं पाणी शिरलं. गावाला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं आहे. तर घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरिता जिल्हा शोध आणि बचाव पथक आसगाव येथे पोहोचलेला आहे. लाखांदूर तालुक्यातील ओपरा या गावातही घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसचं या भागात शेतीचंही मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान आज भंडाऱ्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
![BJP Sangli Nishikant Patil : भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/25/6651832c3d70d0cbf4bcde8a606e34641729834099319719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rohit Pawar Full Speech : संजयकाका पाटलांवर थेट हल्ला, आबांच्या लेकासाठी रोहित पवार मैदानात!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/24/d88e1d27014c181d0f5eb405ddfb45f31729782597500718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sangli 500 Note Viral Video| ओढ्यात पैशांचा पाऊस, नोटा लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/19/2d23bf65f70363d19103bc09488fb7f31729345709431718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay kaka Patil On Sangli Rada : विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात जोरदार वादावादी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/07/206bfb6fd981f686cef47d57e6b4930a172830347184390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/28/ea8fed6e0844eba9f49bcf79a7825b0d172753928241590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)