(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतली
Sanjay Patil and NCP Crisis, सांगली : सांगलीतील कवठे महांकाळमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या वादात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी एकप्रतिज्ञापत्र लिहून माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे. प्रतिज्ञापत्रात अय्याज मुल्ला यांनी गैरसमजुतेतून आणि गोंधळलेल्या परिस्थितीत आपण संजयकाका विरोधात तक्रार दिल्याचे म्हटले आहे. रोहित पाटील मात्र या प्रकरणात नौटंकी करत केविलवाणा प्रयत्न करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचा हा डाव उघडा पडला असल्याचे अय्याज मुल्ली यांनी म्हटलं आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळ यांनी देखील प्रतिज्ञापत्रातून तक्रार मागे घेतली आहे.
संजयकाका पाटलांचा रोहित पाटलांवर हल्लाबोल
कवठे महांकाळ येथे झालेल्या घटनेचा तपशील स्वत: अय्याज मुल्ला यांनी सांगितलेला आहे. आज त्यांनी केस मागे घेतली आहे. त्यांनी अॅफिडेविटमध्ये म्हटलं आहे की, संजकाकांचा कोणताही संबंध नाही. माझा गैरसमज झाला होता. तेव्हा रोहित पाटील राजकारणात नौटंकी करत आहेत. रोहित पाटील सहानूभुती मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आता ते तोंडावर पडले आहेत. आज मोर्चासाठी गावागावात निरोप दिले होते. अतिशय थोडक्या माणसांमध्ये त्याला तो कार्यक्रम करावा लागला होता. मी बाहेरगावी आलेलो आहे, दोन दिवसांमध्ये मी त्यांना उत्तर देणार आहे. त्या सर्व गोष्टींचा मी खरपूस समाचार घेणार आहे. तासगाव-कवठे महांकाळमधील लोकांनी यांची नौटंकी ओळखलेली आहे.