एक्स्प्लोर
Ratnagiri Hanuman Jayanti 2023 : 700 किलो फळांचा वापर करत सजवलं मारुती अळी येथील हनुमान मंदिर
रत्नागिरी जिल्ह्यात देखील हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. पहाटेपासूनच जिल्ह्यातील हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची लगबग, विविध कार्यक्रम, भजन आणि कीर्तन असा सोहळा सुरू झाला आहे. दरम्यान रत्नागिरी शहरातील मारुती अळी येथील हनुमान मंदिरामध्ये 700 किलो फळांचा वापर करत गाभारा सजवण्यात आलाय.. हनुमान जयंतीला अशाप्रकारे फळांचा वापर करत गाभारा सजवण्याचा हा रत्नागिरी जिल्ह्यातला पहिल्यांदाच प्रयोग असल्याचं बोललं जातंय.
आणखी पाहा























