Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Team India Squad Against New Zealand ODI: शुभमन गिल एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. दुखापतीमुळे शुभमन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होऊ शकला नाही.

Team India Squad Against New Zealand ODI: भारतीय संघांची ११ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांसाठी घोषणा करण्यात आली. हा भारतीय क्रिकेट संघाचा नवीन वर्षातील पहिला दौरा न्यूझीलंडविरुद्ध असेल. कॅप्टन शुभमनसोबत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. तथापि, श्रेयस तंदुरुस्त घोषित झाला तरच तो मालिकेत सहभागी होऊ शकेल. श्रेयसला ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान दुखापत झाली होती आणि तेव्हापासून तो खेळू शकत नाही. 11 जानेवारीपासून न्यूझीलंड संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर पाच टी-20 सामने खेळणार आहे. टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची आधीच घोषणा करण्यात आली आहे. आज एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यर परतले
शुभमन गिल एकदिवसीय मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. दुखापतीमुळे शुभमन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होऊ शकला नाही, त्यामुळे केएल राहुल कर्णधारपदी राहिला. भारताने ती मालिका 2-1 अशी जिंकली. मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यर परतले आहेत, परंतु अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आणखी एक निराशा सहन करावी लागली आहे. शमीने शेवटचा भारताकडून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता, जिथे भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून विजेतेपद पटकावले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अपवादात्मक कामगिरी करणारे देवदत्त पडिककल आणि इशान किशन यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. ऋषभ पंतने संघात स्थान राखलं आहे.
🚨 News 🚨
— BCCI (@BCCI) January 3, 2026
India’s squad for @IDFCFIRSTBank ODI series against New Zealand announced.
Details ▶️ https://t.co/Qpn22XBAPq#TeamIndia | #INDvNZ pic.twitter.com/8Qp2WXPS5P
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार*), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग आणि यशस्वी जयस्वाल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वेळापत्रक
- 11 जानेवारी - पहिला एकदिवसीय सामना, वडोदरा
- 14 जानेवारी - दुसरा एकदिवसीय सामना, राजकोट
- 18 जानेवारी - तिसरा एकदिवसीय सामना, इंदूर
- 21 जानेवारी - पहिला टी२०, नागपूर
- 23 जानेवारी - दुसरा टी२०, रायपूर
- 25 जानेवारी - तिसरा टी२०, गुवाहाटी
- 28 जानेवारी - चौथा टी२०, विशाखापट्टणम
- 31 जानेवारी - पाचवा टी२०, तिरुवनंतपुरम
इतर महत्वाच्या बातम्या























