एक्स्प्लोर

फिल्मी स्टाईल थरार! लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या मानेत गोळी घातली, नवरीसमोर क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला

लोकांनी वधूला बाहेर काढले आणि गोंधळ उडाला. आनंदी वातावरण असताना क्षणात सन्नाटा झाला. वराचा भाऊ आणि नातेवाईकांनी इर्शादला रुग्णालयात नेले, परंतु तो वाचू शकला नाही.

Groom Shot Dead: धुमधडाक्यात लग्न सुरु असतानाच नवरदेवाच्या गळ्यात गोळी घालून ठार केल्याची भयंकर घटना घडली. मृत नवरदेव मुंबईत टेलर होता. तो लग्नासाठी बिहारमधील खगरियामध्ये गेला  होता. मोहम्मद इर्शाद असे त्याचे नाव आहे. लग्नानंतर विधी सुरू असतानाच गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली. इर्शादच्या भावाने झालेला थरार सांगितला. तो म्हणाल की,  एक मुलगा आला आणि वराच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसला. त्याने बंदूक काढली आणि हवेत गोळी झाडली. आम्ही स्तब्ध झालो. त्याने बंदूक लोड केली आणि गोळी झाडताच, गोळी वर जाण्याऐवजी वराच्या मानेत लागली.

आनंदी वातावरण असताना क्षणात सन्नाटा 

मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील कुतुबपूर भागात शनिवारी रात्री 11 वाजता ही घटना घडली. वराचा मोठा भाऊ शमशाद म्हणाला, "आम्ही इर्शादला खगरिया येथे घेऊन गेलो, पण त्याच्या मानेतून सतत रक्तस्त्राव होत होता. थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला." वधूसमोर हा अपघात झाला. लग्नात उपस्थित असलेल्यांनी सांगितले की लग्नादरम्यान अचानक गोळीबार झाला. आम्हाला काही समजण्यापूर्वीच, वराला कार्पेटवर पडलेले पाहिले, त्याच्या मानेतून रक्तस्त्राव होत होता. लोकांनी वधूला बाहेर काढले आणि गोंधळ उडाला. आनंदी वातावरण असताना क्षणात सन्नाटा झाला. वराचा भाऊ आणि नातेवाईकांनी इर्शादला रुग्णालयात नेले, परंतु तो वाचू शकला नाही. गोळीबार करणारा आरोपी फरार झाला. 

विधी होत असतानाच गोळी वराला लागली

मुफस्सिल पोलिस स्टेशन परिसरातील कुतुबपूर येथून लग्नाची मिरवणूक आली होती. मोहम्मद इर्शादचे लग्न रुखसार खातूनशी होत होते. ही घटना घडली तेव्हा वधू, रुखसार खातून देखील स्टेजवर होती. विधी होत असतानाच गोळी वराला लागली. कुटुंबीयांना त्याला तातडीने खगरिया शहरातील बलूही येथील नेक्टर हॉस्पिटलमध्ये नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला बेगुसराय येथे रेफर केले. बेगुसरायच्या डॉक्टरांनीही त्याला पाटणा येथे रेफर केले. तोपर्यंत मोहम्मद इर्शादचा वाटेतच मृत्यू झाला. वराचा मोठा भाऊ मोहम्मद शमशाद म्हणाला, "पहिल्या गोळीचा आवाज इतका जोरदार होता की सर्वांनी त्याला गोळीबार करू नका असे सांगितले. पण त्याने गोळी लोड केली होती. त्याच्या बोटाने ट्रिगर दाबला आणि गोळी थेट माझा भाऊ, वराचा, मोहम्मद इर्शादच्या मानेवर लागली."

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिनीच महिलेचा संशयास्पद मृत्यू 

दरम्यान, वैशाली जिल्ह्यामध्ये लग्नाच्या दुसऱ्या वाढदिनीच एका महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मृत महिलेची ओळख काजल (28) अशी झाली आहे. काजलची बहीण नीतू हिने नीतूची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला. तिच्या सासू, मेहुणी, सासरे आणि पतीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी घडली. काजलच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की शुक्रवारी तिचा दुसरा लग्नाचा वाढदिवस होता. राजापाकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैकुंठपूर पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये शुक्रवारी रात्री ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच राजापाकर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह तिच्या पालकांच्या ताब्यात दिला.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Punjabi Singer Baljeet Singh Found Dead: हात वरच्या दिशेनं, बेडवर मृतदेह; प्रसिद्ध गायकाच्या मृत्यूनं खळबळ, पोलिसांनी रुममध्ये एन्ट्री करताच थरकाप उडवणारं दिसलं, नेमकं काय घडलं?
हात वरच्या दिशेनं, बेडवर मृतदेह; प्रसिद्ध गायकाच्या मृत्यूनं खळबळ, पोलिसांनी रुममध्ये एन्ट्री करताच थरकाप उडवणारं दिसलं, नेमकं काय घडलं?
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Embed widget