एक्स्प्लोर

Nanded crime: 'सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन'; नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा मनाला चटका लावणारा शेवट

Nanded Crime: माझ्या घरचे सक्षमची गेम टाकण्याचं प्लॅनिंग करत होते, तीन गोळ्या लागल्या तरी त्याला काही झालं नाही मग त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला ठार मारण्यात आले.

Nanded Murder case: एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रातील जातीभेद किती विखारी स्वरुपाचा आहे, याचे प्रत्यंतर गुरुवारी नांदेडमध्ये आले. नांदेडच्या मिलिंद नगर इटवारा परिसरात सक्षम ताटे (वय 20) या तरुणाची हत्या करण्यात आली. सक्षम ताटे याचे आंचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. याच वादातून आंचल मामीडवार हिचे वडील गजानन मामीडवार आणि भाऊ हिमेश मामीडवार व साहिल मामीडवार यांनी सक्षम ताटे याची डोक्यात फरशी व दगड घालून हत्या (Murder news) केली. या घटनेनंतर आंचल मामीडवार या तरुणीने केलेली कृती राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आंचल मामीडवार हिने सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्याच्यासोबत लग्नाचे काही विधी पार पडले. या दोघांच्याही अंगाला हळद लावण्यात आली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले. सक्षम ताटे याच्या अंत्यसंस्काराचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सक्षम ताटे आणि आंचल मामीडवार या दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची होती. सक्षम आणि आंचल हे वयाने लहान असल्याने त्यांचे प्रेमप्रकरण, त्यांची समज आणि आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करण्याचा निर्णय याविषयी अनेक परस्परविरोधी मतं व्यक्त होताना दिसत आहेत. परंतु, या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील जातीभेदाचा विखार अजूनही किती भयंकर स्वरुपाचा आहे, ही बाब नजरेआड करता येणार नाही. (Girl did marriage rituals with boyfriend dead body in Maharashtra)

या सगळ्या घटनेविषयी आंचल मामीडवार हिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तिने म्हटले की, गेल्या तीन वर्षांपासून सक्षम आणि माझे प्रेमसंबंध होते. ते आमच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यामुळेच त्यांनीच सक्षमचा घात केला. माझे वडील गजानन मामीडवार, हिमेश मामीडवार आणि साहिल मामीडवार यांनी सक्षमची हत्या केली. सक्षम याच्यावर एमपीडी पडली होती. तो जेलमधून सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याची गेम टाकण्याच्या मार्गावर होते. ते मला धमकी देत होते की, आम्ही सक्षमला मारुन टाकणार. त्यांनी सक्षमला गोड बोलून इटवारा परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर नशा करुन त्याला मारले. सक्षमवर तीन गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. मग त्याच्या डोक्यात फरशी टाकून त्याला मारले, असे आंचल मामीडवार हिने सांगितले.

आमचं प्रेम होतं. पण माझ्या पप्पांना आम्हा दोघांची जात वेगळी असल्यामुळे ते मंजूर नव्हतं. ते म्हणायचे, दुसरं कोणाशीही बोल मी लग्न लावून देतो. सक्षम बौद्ध होता, आम्ही पद्मशाली समाजाचे आहोत. जात वेगळी असल्यामुळेच माझ्या घरच्यांनी सक्षमला संपवले. आमच्या प्रेमसंबंधामुळेच त्याला मारण्यात आले. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे आंचल मामीडवार हिने म्हटले.

Nanded crime news: मी आयुष्यभर सक्षमसोबतच राहीन: आंचल मामीडवार

सक्षम ताटे याचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला होता तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराची मोठी गर्दी झाली होती. सक्षमचा मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. सक्षमच्या मृतदेहाला आणि आंचलच्या अंगाला हळद लावण्यात आली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले. यानंतर तिने म्हटले की, मी सक्षमसोबत लग्न केले आहे. तो आता नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे.  मी मनाने कायम त्याच्यासोबत राहीन. मी आता सक्षमच्या घरीच राहणार आहे, मला सक्षमसोबतच राहायचे आहे, असे आंचल मामीडवार हिने सांगितले.

आणखी वाचा

जातीय विखारातून वडिलांनी प्रियकराला संपवलं, प्रेयसीने मृतदेहाशी लग्न केलं, अंगाला हळद अन् कपाळावर कुंकू भरलं

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Sangli Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
शेजाऱ्यांमध्ये वाद; लहान मुलांसमोरच आई-वडिलांवर हातोडी अन् सुरीने वार, आधी पत्नीचा नंतर उपचारावेळी पतीचाही मृत्यू, 15 वर्षीय मुलीने सांगितली आपबीती
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget