Ajay Dhagale Martyred : सिक्कीमच्या हिमस्खलनात मोरवणेचे सुपुत्र सुभेदार अजय ढगळे शहीद
Ajay Dhagale Martyred : सिक्कीमच्या मोरवणेचे सुपुत्र सुभेदार अजय ढगळे शहीद
27 मार्चला भारत चीन सीमेवर रस्त्याच्या रेकीसाठी गेलेले सुभेदार अजय ढगळे तवांगजवळील जिमीथाब येथे झालेल्या भूस्खलनात हुतात्मा झाले. दरम्यान शहीद सुभेदार अजय ढगळे यांचे पार्थिव आज रत्नागिरी विमानतळावर आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. ढगळे चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावचे रहिवासी आहेत. 28 वर्ष त्यांनी सैन्यामध्ये सेवा केली. उद्या त्यांची अंत्ययात्रा चिपळूण येथून निघणार आहे.
यावेळी हजारो नागरिक अंत्ययात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी आठ वाजता चिपळूण येथे हे अंत्ययात्रा सुरू होणार आहे. सावळी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी देखील हजर असणार आहेत. त्यानंतर लष्करी इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील.























