(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Punekar on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...
Punekar on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...
हेही वाचा :
राज्यात आता थंडीची लाट पसरली आहे. फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासांमध्ये तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यात वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव शहरासह अनेक ठिकाणी तापमानात मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे. नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा पेटवताना दिसून येत आहेत. (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काल (बुधवारी) 27 नोव्हेंबर रोजी पुण्यात रात्रीचे तापमान 9.9 अंश सेल्सिअस इतके होते. यंदा कडाक्याची थंडी पुण्यात जाणवू लागली आहे. वर्षीतील हे पहिलेच एक अंकी किमान तापमान नोंदवले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये फेंगल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे राज्यात आर्द्रता कमी होणार असून आणखी थंडी वाढणार आहे. या वादळामुळे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे काही राज्यात जोरदार पावसाती शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update) मध्य महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रात भागाला थंडीचा अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र व विदर्भात देखील थंडी वाढली आहे.