ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 11 January 2025
संतोष देशमुख हत्याप्रकरणात आज 7 जणांना मोक्का लागला आहे. राहिलेला आठवा सुद्धा मोक्यात गेला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा 302 झाला पाहिजे. यामध्ये सुद्धा आका आहे. तोच मेन असल्याचा हल्लाबोल भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. वरच्या आकाने 19 ऑक्टोबरला स्वत: सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली. तो यामध्ये आरोपी का नाही? असा सवाल धसांनी केला. दीड़ कोटीसाठी संतोष देशमुखांची हत्या केली आहे. वाल्याकाका दीड नाहीतर संतोषसाठी आम्ही 3 कोटी गोळा करुन दिले असते असेही धस म्हणाले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सुरेश धस बोलत होते. राजुरीत जामखेड नावाचं गाव आहे. तिथं एक अपघात झाला. यावेळी गाडीच्या चाकखाली कुत्रा मेला आम्ही गाडीत बसणाऱ्या सर्वांना वाईट वाटलं. पण संतोषला कुठल्या पद्धतीने मारलं. मारताना तो पाणी मागत होता पण त्याला पाणी दिलं नाही असे सुरेश धस म्हणाले. धाय मोकलून रडणाऱ्या माणसाच्या व्हिडिओ काढला आणि आकाला दाखवल्याचे धस म्हणाले. तुम्ही 100 लोकात मारुन त्याला घरी पाठवल्याचे सुरेश धस म्हणाले. तुमच्याकडे पैसा आणि माज आलाय असेही धस म्हणाले.