एक्स्प्लोर

69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गणपती बोरगाव हे दिनकर बिरारे यांचा मूळ गाव, आई वडिलांची परिस्थिती नाजूक होती

छत्रपती संभाजीनगर: देशातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत असल्यामुळे व्यसनाधीनता चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे देशाच भवितव्य असलेल्या तरुणांनी निर्व्यसनी राहावं हा संदेश घेऊन निवृत्त अधिकाऱ्याने तब्बल 4 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे. छत्रपती संभाजीनगरपासून (Sambhaji nagar) सुरू झालेला हा सायकल प्रवास 4 हजार किलोमीटर असलेल्या नर्मदा परिक्रमा येथे संपला. आराम करण्याच्या वयात तरुणांसाठी संदेश घेऊन केलेल्या सायकल (Cycle) प्रवासामुळे या निवृत्त अधिकाऱ्याचं जिल्ह्यात कौतुक होतंय. विशेष म्हणजे या नर्मदात परिक्रमा यात्रेला जाण्यासाठी यांच्या पत्नीचा विरोध होता, तरीही ते निर्णयावर ठाम होते. त्यामुळेच, घरी आल्यानंतर औक्षण करुन, हार घालून बच्चे कंपनींकडून आजोबांचं जल्लोषात स्वाग करण्यात आलं. दिनकर बिरारे असे सायकल प्रवास करणाऱ्या क्षेत्रीय निवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गणपती बोरगाव हे दिनकर बिरारे यांचा मूळ गाव, आई वडिलांची परिस्थिती नाजूक होती. आई-वडिलांच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे शेतात काम करून 10 वी पर्यंतच शिक्षण मामाकडे पूर्ण केल. छत्रपती संभाजीनगर येथे हॉटेलमध्ये काम करून उच्चशिक्षण शिक्षण पूर्ण केलं. नोकरी लागल्यानंतर पदोन्नती मिळत ते क्षेत्रीय अधिकारी झाले. संपूर्ण नोकरीत त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं. शासकीय वाहन असताना बिरारे यांनी कार्यालयात ये जा करण्यासाठी पाई किंवा रिक्षाचा वापर केला. शासकीय सेवेत तब्बल 36 वर्षानंतर दिनकर बिरारे निवृत्त झाले. तर, कुठलंच व्यसन नसल्याने आजपर्यंत मला एकही आजार नाही, असे दिनकर बिरारे अभिमानाने सांगतात. तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढली आहे. हीच व्यसनाधीनता देशातील भविष्यासाठी संकट ठरू शकते. यामुळे तरुणांनी निर्व्यसनी राहावं हा संदेश घेऊन दिनकर बिरारे यांनी 4000 km चा प्रवास केला. छत्रपती संभाजीनगर पासून सायकलवर सुरू झालेला हा प्रवास ओंकारेश्वर- अमरकंटक परत ओंकारेश्वर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला परत आले.प्रवासादरम्यान त्यांनी रस्त्यात भेटणाऱ्या तरुणांना निर्व्यसनी व निरोगी राहण्याचा संदेश दिला.

तरुणांनी निर्व्यसनी राहावं हा संदेश घेऊन संपूर्ण प्रवास केला. सायकलवर 4 हजार किलोमीटरचा प्रवास करून मी घरी परतल्याने मला आनंद वाटत आहे. या प्रवासात मला कुठलाच थकवा जाणवला नाही. भविष्यात तरुणांनी निर्व्यसनी राहावे, यासाठी जनजागृती करत राहणार आहे, असेही दिनकर बिरारे यांनी म्हटले. 

पत्नीने नकार दिला, तरीही ते ठाम होते

नर्मदा परिक्रमाचा प्रवास करण्यासाठी जायचं आहे, असं त्यांनी मला सांगितलं. तेव्हा मी नकार दिला. मात्र त्यांच्या निर्णयावर ते ठाम होते. त्यांची तयारी करून देण्यासाठी माझे हात धजावत नव्हते. त्यांच्या प्रवासात मी त्यांना कॉलवर बोलायचे, मात्र काळजी वाटत होती. आजोबा घरी येणार हे कळताच लहानांपासून मोठ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केलं. 

बाबांचे घरी जल्लोषात स्वागत

लहानपणापासून अहोरात्र मेहनत केलेल्या बाबांनी आता आराम करावा अशी आमची इच्छा होती.मात्र नर्मदा परिक्रमाचा प्रवास सायकलवर करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.आम्ही त्यांना नकार दिला. मात्र बाबा त्यांच्या निर्णयावर ठाम होते.बाबांनी आजपर्यंत आम्हाला सोडून कधीच प्रवास केला नाही. प्रवासाच्या पहिल्या दिवसापासून घरी येईपर्यंत आम्हाला प्रचंड काळजी वाटत होती. एवढा मोठा प्रवास करून बाबा सुखरूप घरी आल्याने आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
Embed widget