Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!
Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!
वसईच्या मयंक ज्वेलर्सवर राञीच्या सुमारास दरोडा पडला आहे. चोरट्यांनी ५० तोळे सोने, जवळपास ४० लाखाचे सोने लुटून पसार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. घटनेचा संपूर्ण थरारर सीसीटीवी विडीओ ही एबीपी माझाच्या हाती लागला आहे. वसईच्या कौल हेरीटेज सिटी येथील, अग्रवाल अॅँण्ड दोस्ती कॉम्प्लेक्स मधील मयंक ज्वेलर्स वर शुक्रवारी राञी सव्वा नऊ वाजता दरोडा पडला आहे. दुकानाचे मालक रतनलालजी सिंघवी हे शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजता दुकान बंद करत, ज्वेलरी लॉकर मध्ये ठेवत असताना, दोन जण बाईक वर आले. एकाने हॅल्मेट घातला होता, तर दुस-याने चेह-याला मास्क लावला होता. दोघेही फोर्सफुली दुकानात प्रवेश करत, बंदूकीच्या साहय्याने रतनलालजी सिंघवी यांना धमकी देवू लागले, त्यांनी प्रतिकार करताच, त्याना बंदूकीच्या साह्य्याने डोक्यावर मारहाण करत जखमी केलं. आणि दुकानाच्या आतील तिजोरी मधून, १५ ते २० सोन्याचे बॉक्सेस घेवून चोरटे पसार झाले आहेत. पोलिसांनी सहा ही पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण विभागाच्या टिम तपास कामी रवाना केल्या आहेत. लवकरच चोरट्यांना पकडू असा विश्वास ही व्यक्त केला आहे. रतनलालजी सिंघवी यांना वसईच्या कार्डिनल ग्रेसेस रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मयंक ज्वेलर्स रतनलालजी आणि त्याचा मुलगा मनीष सिंघवी हे चालवायचे. माञ त्या दिवशी मनीष कामानिमित्त बाहेर असल्याने रतनलालजी एकटेच दुकान बंद करत होते.