Pune Merchant | पुण्यातील व्यापारी महासंघाचा पुन्हा लॉकडाऊनला विरोध, सम-विषम पद्धतीबाबत व्यापाऱ्यांची नाराजी
पुण्यातील दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारपासून प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर नियमानुसार व्यवहार पूर्ववत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे व्यापारी महासंघाने आज पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी व्यापारी महासंघाने पी वन आणि पी टूला सक्त विरोध केला आहे. आठवड्यातील पाच दिवस दुकानात सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी आणि दोन दिवस लॉकडाऊन जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली.
याप्रकरणी आयुक्तांनी सर्व व्यापाऱ्यांना आणि कामगारांना कोरोना चाचणी करण्याची सूचना दिली. त्यानुसार 30 हजार व्यापाऱ्यांची आणि 1 लाख कर्मचाऱ्यांची चाचणी टप्प्याटप्प्याने होणार आहे. मात्र व्यापाऱ्यांनी सम आणि विषम तारखेला दुकानं सुरू आणि बंद ठेवण्याला सक्त विरोध केलाय. यापुढे आम्ही लॉक डाऊन करणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली.























