Ganesh Chaturthi Flower Prices | Pune पुण्यात गुलछडीच्या फुलांना सोन्याचा भाव,खरेदीसाठी गर्दी!
गणेशोत्सवानिमित्त पुणेकरांनी Market Yard मध्ये फूल खरेदीसाठी गर्दी केली आहे. यंदा Gulchadi च्या फुलांनी चांगलाच भाव खाल्ला आहे. पुण्यातल्या फूल Market मध्ये मोदकापेक्षाही Gulchadi ची फुलं महाग असल्याचं चित्र आहे. मुसळधार पावसामुळे आणि आवक कमी असल्यानं Gulchadi ची फुलं पंधराशे ते अठराशे रुपये किलोनं विकली जात आहेत. एका विक्रेत्याने सांगितले की, "Gulchadi या वर्षी पाऊस खूप झाला. तीन महिने कंटिन्यू पाऊस असल्यामुळे रोगराई जास्त झालेली आहे. त्याला किडीचं प्रमाण जास्त आहे. मालाची Quality बिघाडली आहे. आवक कमी आहे Gulchadi ची. रोगराई झाल्यामुळे आवक कमी आहे. त्यामुळे बाजार वाढलेले आहेत." मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने Gulchadi ला सोन्याचा भाव आल्याचे म्हटले जात आहे. Pune Market Yard मध्ये फुलांच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे.
























