Pune Drugs Case : पुणे का बनलं ड्रग्जचं हब? पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश
एकीकडे पुणे गुन्हेगारांचा अड्डा बनलंय, तर दुसरीकडे पुणे ड्रग्सच्या विळख्यात अडकल्याचं समोर आलंय.. आज पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांविरोधात मोठी कारवाई केलीय.. तब्बल ४ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलंय... पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केलीय.. याप्रकरणी ३ ड्रग्स तस्करांना पोलिसांनी अटक केलीय. विठ्ठल साळुंखे या पोेलिसाला ड्रग्ज तस्करांबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यावर गुन्हे शाखेनं तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली. यामध्ये वैभव उर्फ पिंट्या मानेचा समावेश आहे. माने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ३६ केसेस आहेत. तर ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या हैदर शेख नावाच्या व्यक्तीला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे ड्रग्ज परदेशातून आल्याचं चौकशीत समोर आलंय. त्यामुळे पुण्यात ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.