(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Drugs Case : पुण्यनगरी की 'ड्रग्ज 'नगरी; आता पब्सवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार
Pune Drugs Case : पुण्यनगरी की 'ड्रग्ज 'नगरी; आता पब्सवर जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पोलिसांनाही भोवलं आहे. पुण्यातील पार्टी प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक व्ही बी बोबडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. कर्तव्यात कसून केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील एफसी रोडवरील L3 बार हॉटेल पार्टी प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी मोठी कारवाई पुण्यातील L3 बारमध्ये सुरू असलेल्या पार्टी संदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. बोबडे यांच्या कार्यक्षेत्रात हा बार होता, मात्र तरीसुद्धा पार्टी सुरू असताना ते त्यांच्या परिक्षेत्रात नव्हते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी त्यांच्या निलंबनाचे निर्देश जारी केले आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक बोबडे निलंबित राज्य शुल्क विभागाने निलंबनाचा निर्देश जारी करताना त्यात लिहीलं आहे की, पुण्यातील शिवाजी नगर परिसरातील एफ. सी. रोडवरील हॉटेल रेनबो येथे मद्य प्राशन आणि ड्रग्ज सेवन करत असल्याची बातमी दाखवण्यात आली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांनी व्यवस्थापक मोहित राजेश शर्मा यांचा जबाब नोंदवून 23 जून रोजी आरोपपत्र दाखल केलं. यामध्ये मद्य आणि अंमली पदार्थ विरोधी नियमाचं उल्लंघन होत असल्याचं समोर आलं.