एक्स्प्लोर
Protest Politics: 'हा सत्याचा नाही, असत्याचा मोर्चा', MVA-MNS च्या मोर्चावर भाजपचे Navnath Ban कडाडले
महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) यांच्या उद्या होणाऱ्या मोर्चावर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी जोरदार टीका केली आहे. 'खरं तर हा सत्याचा मोर्चा नाही तर असत्याचा मोर्चा आहे,' असे म्हणत बन यांनी या मोर्चाला 'असत्याचा मोर्चा' संबोधले आहे. महाविकास आघाडीचे धोरण सातत्याने असत्य बोलणे आणि पसरवणे हेच राहिले आहे, असा आरोपही त्यांनी केला. निवडणूक आयोगावर विश्वास नसणाऱ्यांनी मोर्चा काढण्याआधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा, असे आव्हान बन यांनी दिले आहे. उबाठा गटाकडून फॅशन स्ट्रीटवरून काढण्यात येणारा हा 'फॅशन शो' महाराष्ट्राच्या जनतेने आधीच फ्लॉप केला आहे आणि उद्याही तो फ्लॉप होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















