एक्स्प्लोर

Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आका देवेंद्र फडणवीस, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप, पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी

Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: फलटण युवती डाॅक्टर आत्महत्या, रणजितसिंह निंबाळकर क्लीन चिट, पवईमधील अपहरण कांड, तसेच गडचिरोलीमधील उत्खणन मुद्यावरून सपकाळ यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले.

Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: राज्यातील सर्वात मोठा आका देवेंद्र फडणवीस असून ते गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. राज्यात ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, फलटण युवती डाॅक्टर आत्महत्या, रणजितसिंह निंबाळकर क्लीन चिट, पवईमधील अपहरण कांड, तसेच गडचिरोलीमधील उत्खणन मुद्यावरून सपकाळ यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप करताना राज्याला पूर्णवेळ गृहमंत्र्याची मागणी पक्षाकडून असल्याचे ते म्हणाले. 

गडचिरोलीच्या उत्तखनातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीचा आका सुद्धा फडणवीस 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "राज्यातील सर्वात मोठा आका देवेंद्र फडणवीस आहेत. ते गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत. गडचिरोलीमधील उत्खणनामधून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीचा आका सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत. सपकाळ यांनी फडणवीस यांनी फलटणमध्ये निंबाळकरांना दिलेल्या क्लीन चिटवरूनही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, फडणवीस फलटणला जातात आणि रणजितसिंह निंबाळकर यांना क्लीन चिट देतात. 

गोळी कोणी चालवायला तर नाही सांगितली? 

हर्षवर्धन सपकाळ यांनी पवई अपहरणकांडवरूनही संशय व्यक्त केला. ते म्हणाले त्या अपहरण कांडमध्ये नेमकं काय झालं?  ठेकेदारांची सुद्धा छळ होत आहे. पैसे मिळत नाहीत म्हणून आर्याने चुकीचा कृत्य केलं, त्याचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, महाराष्ट्र पोलिसांना गोळी कोणी चालवायला तर नाही सांगितली? कारण पुढे त्याने काही बोलू नये, त्याचे फोटो अनेकांसोबत होते.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही 

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राला पूर्णवेळ गृह मंत्री नसल्याने आणि ते (फडणवीस) आकासारखे वावरत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. पूर्णवेळ गृहमंत्री मिळावा अशी काँग्रेस पक्षाची मागणी असल्याचे ते म्हणाले.

फलटणमधील प्रकरणावरूनही हल्लाबोल 

सपकाळ यांनी फलटणमधील आत्महत्या प्रकरणावरूनही सपकाळ यांनी सरकारवर सडकून प्रहार केला. ते म्हणाले की,  ती आत्महत्या म्हणायची का? याल संपूर्ण सरकार जबाबदार आहे. फटलणचे आकाला विशेष सुविधा महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. फडणवीस पुरस्कृत घटना तिथं होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. 

दाराच्या फटीतून पाहणारा भाजप पक्ष 

सपकाळ यांनी पाळत ठेवत असल्याचा आरोपही केला आहे. त्यांनी सांगितले की, मी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता आहे. सर्वोदय आश्रमात मी राहतो आणि ती शिस्त मी पाळतो, ते माझं घर आहे. भाजप दाराच्या फटीतून पाहणारा पक्ष आहे. आज तिसऱ्यांदा घटना घडली आणि गावदेवी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आणि सांगितलं तुम्ही पाळत ठेवताय हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का? त्यांनी सांगितले की, सकाळी मला पोलीस म्हणाले, तुम्ही आलात का? प्रेस घेणार का?  मी त्यांना विचारलं की, तुम्ही पाळत ठेवत आहात का? चौकशी का करताय? खोलीमध्ये काय आहे ते पाहत होते. हेरगिरीचा हा सगळा प्रकार आहे. पेगासिसवर ते थांबले नाहीत, तर सरळ खोली आणि बेडरूममध्ये पोलीस येत आहेत. आलेला व्यक्ती एकटा होता. सध्या वेशातील होता पोलीस होता, त्याच्या बोलण्यातून दिसत होते  असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढणार, पुढील पाच दिवस कसं असणार हवामान? कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Embed widget