शिवसेनेची बुलंद तोफ अचानक दोन महिन्यांच्या विश्रांतीवर, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत सुषमा अंधारेची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट
Sushma Andhare on Sanjay Raut: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांच्यासाठी लवकरात लवकर बरा असे सांगताना मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत भावूक पोस्ट केली आहे.

Sushma Andhare on Sanjay Raut: आपल्या दररोजच्या पत्रकार परिषदेतून सत्ताधारी महायुतीला सळो की पळो करून सोडणारे, शिवसेनेची धडाडती तोफ खासदार संजय राऊत यांनी (Shiv Sena Sanjay Raut health) पुढील दोन महिन्यांसाठी सार्वजनिक जीवनापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकृतीमध्ये झालेल्या बिघाडाच्या कारणास्तव त्यांनी (Sanjay Raut letter to supporters) कार्यकर्त्यांना आणि मित्रांना उद्देशून पत्र लिहीत पुढील दोन महिन्यांसाठी गर्दीमध्ये मिसळणे आणि बाहेर जाण्यासाठी डॉक्टरांकडून निर्बंध घालण्यात आल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे नववर्षाला सुरुवातीला आपण भेटू असं त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या पोस्टनंतर राज्यभरातून तुम्ही लवकर बरे व्हा असा संदेश दिला जात आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांच्यासाठी लवकरात लवकर बरा असे सांगताना मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणत भावूक पोस्ट केली आहे.
आम्ही सगळे आपली वाट बघत आहोत..! (Sanjay Raut health condition)
सुषमा अंधारे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, लवकर बरे व्हा.. आम्हाला कल्पना आहे की सार्वजनिक रित्या जरी आपण मिसळू शकणार नसलात तरी सुद्धा इथल्या पाताळयंत्री अजस्त्र महाकाय शक्ती विरोधात जी लढाई आपण उभी केलेली आहे ; त्या लढाईला वैचारिक रसद या दोन महिन्यात सुद्धा आपण पुरवत राहणार आहात...
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा
— SushmaTai Andhare (@andharesushama) October 31, 2025
लवकर बरे व्हा.. आम्हाला कल्पना आहे की सार्वजनिक रित्या जरी आपण मिसळू शकणार नसलात तरी सुद्धा इथल्या पाताळयंत्री अजस्त्र महाकाय शक्ती विरोधात जी लढाई आपण उभी केलेली आहे ; त्या लढाईला वैचारिक रसद या दोन महिन्यात सुद्धा आपण पुरवत राहणार आहात...… https://t.co/zMgbsY3cDB pic.twitter.com/Q8OiWZu7zX
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणजे नेमकं काय समजतं (Sushma Andhare on Sanjay Raut)
सन्माननीय पक्षप्रमुखांवर चौफेर हल्ले होत असताना छातीचा कोट करून आपण हा शिवसेनेचा गड वाचवण्यासाठी उभे राहिलात... खऱ्या अर्थाने मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणजे नेमकं काय हे आपल्याकडे बघितल्यावर महाराष्ट्राला कळतं... आपण ठणठणीत बरे होणार आहात.. आपल्यासोबत फक्त महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचेच नाही तर इथला प्रत्येक दबलेला पिचलेला आणि भाजपच्या दंडेलशाहीने मेटाकुटीस आलेला प्रत्येक माणूस आपल्यासारख्या लढाऊ शिलेदारासाठी ठामपणे उभा आहे या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत.. आपल्याला उदंड आयुष्य लाभो..! आम्ही सगळे आपली वाट बघत आहोत..!
इतर महत्वाच्या बातम्या























