एक्स्प्लोर

Pooja Khedkar Case : महाविद्यालयात प्रवेश घेताना पूजा खेडकर यांनी फीट असल्याचं सर्टिफिकेट सादर केलं

Pooja Khedkar Case : महाविद्यालयात प्रवेश घेताना पूजा खेडकर यांनी फीट असल्याचं सर्टिफिकेट सादर केलं  आपल्या कारनाम्यांमुळे चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे (IAS Pooja Khedkar) पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरने (IAS Pooja Khedkar) एम.बी.बी.एसचे शिक्षण पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून पुर्ण केलं होतं. तिथे प्रवेश घेताना तिने ती पुर्णतः फीट असल्याचं तिला कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्याचबरोबर त्यावेळी तिचे वडील दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असताना देखील तिने ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमीलियर सर्टिफिकेट देखील सादर केलं असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेताना तिचं नाव पूजा दिलीपराव खेडकर म्हणून नोंद करण्यात आलं होतं. या सगळ्याबाबत या वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ अरविंद भोरे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.   त्यानंतर आता पूजाने (IAS Pooja Khedkar) आयएएस हाेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेले आहे. दिव्यांग काेट्यातून तिला नाेकरीही मिळाली. मात्र आता वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेताना अपंगत्व प्रमाणपत्र दिलेले नाही. मग यूपीएससीच्या वेळीच तिला दिव्यांगपणा आला का असा? प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यावेळी खेडकरला सीईटीमध्ये २०० पैकी १४६ गुण मिळाले होते. दरम्यान या गोष्टींवरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.   त्याचबरोबर परिक्षेनंतर पूजा खेडकरची आयएएसपदी नियुक्ती देखील झाली. पुण्यात तिचा प्रोबेशन कालावधी सुरू असतानाच तिने आपल्या खासगी ऑडी कारला लाल-निळा दिवा लावला. त्याचबरोबर तिने आपल्या त्याच गाडीवर ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्डही लावला होता. याशिवाय प्रोबेशन काळ सुरू असताना तिने सरकारी कार्यालयात स्वतंत्र केबीन, सरकारी गाडी, घर, सरकारी कर्मचारी अशा गोष्टींची मागणी केली होती. यामुळे तिच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहीत तक्रार करण्यात आलेली होती. त्यानंतर पूजा खेडकरची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली. हे प्रकरण चर्चेत असतानाच पूजा खेडकरच्या सोबतच तिच्या कुटुंबियांचे देखील रोज नवे खुलासे समोर येत आहेत.   महाविद्यालयाच्या कागदपत्रावरून आता पूजाच्या अडचणी वाढण्याची शक्यता   पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात २००७ मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला हाेता. त्यावेळी सीईटीद्वारे तिला प्रवेश मिळाला हाेता. त्यावेळी देखील तिने एनटीसी-३ या प्रवर्गातून प्रवेश घेतला होता, तिचे नाॅन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे नगरचे एसडीओ यांचे आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.

पुणे व्हिडीओ

Pune Rain Monsoon Vastav EP 66 : स्मार्ट सिटी म्हणवणारं पुणे तुंबलं, जबाबदारी कुणाची? ABP Majha
Pune Rain Monsoon Vastav EP 66 : स्मार्ट सिटी म्हणवणारं पुणे तुंबलं, जबाबदारी कुणाची? ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nana Patole on Zeeshan Siddique : झिशान सिद्दिकी यांना त्यांची जागा दाखवणार, नाना पटोले संतापलेZeeshan Siddique : क्रॉस व्होटिंगबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट, Chennithala यांचं नाव घेत म्हणाले...Jarange vs Fadnavis Special Report : जरांगेच्या निशाण्यावर युतीचे बॉस, प्रत्युत्तरात 'संन्यास'Aditya Thackeray Narali Poornima : आदित्य ठाकरेंनी कोळी बांधवांसोबत साजरी केली नारळी पौर्णिमा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
म्हाडाच्या घरांसाठी अधिवास प्रमाणपत्र कधीचं हवं? उत्पन्न किती असावं? अर्ज कसा करायचा? वेबिनारमध्ये A To Z माहिती
Palghar : रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
रक्षाबंधन करून निघालेल्या कुटुंबावर काळाची झडप, दोन ठार, मृतांमध्ये 10 वर्षांचा मुलगा
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नारळी पौर्णिमेच्या उत्साहाला दु:खाचं गालबोट; समुद्रात बुडून 3 खलाशांचा, सुदैवाने 1 बचावला
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
नवाब मलिकांच्या कन्येस राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी; अजित पवार म्हणाले, सना तू घाबरू नको
Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष
झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलातन्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
धक्कादायक! प्रियकराच्या गुप्तांगावर उलातन्याने वार, स्व-संरक्षणाठी प्रेयसीकडून हल्ला; गुन्हा दाखल
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
मुख्यमंत्री गावाकडं निघाले, 160 हॉर्स पॉवरची खास शिवप्रताप सज्ज; नव्या बोटीची वैशिष्ट भारी
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!
Embed widget