Loksabha Election 2024 Pune : बीडचे लोककलाकार मतदानासाठी गावी जाणार; वासुदेवांसोबत चर्चा
Loksabha Election 2024 Pune : बीडचे लोककलाकार मतदानासाठी गावी जाणार; वासुदेवांसोबत चर्चा डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, हातात चिपळ्या हे रुप पाहिलं की मुखी हरीनामाचा जप करणारा वासुदेव आपल्या नजरेस पडतो. पुण्यातील नारायण पेठेत एक असाच वासुदेवांचा समूह जाताना पाहायला मिळाला. मूळचे परळी वैजनाथ चे असलेले हे सगळे लोककलाकार उद्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गावी जाणार आहेत. मात्र सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली असून हे सगळे नेते एकच आहेत पण त्रास सामन्यांना करावा लागतो अशा शब्दात त्यांनी त्यांचं मत मांडलं. या वासुदेवांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी यांनी...























