(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chanda Te Banda 21 May 2024 : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 21 May 2024 : ABP Majha
मतदानाच्या गैरसोयीची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, मुख्य सचिव नितीन करीर यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश
उद्धव ठाकरेंच्या बोटाला हिरवी शाई, कमी मतदानाच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांचा हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा शंभर टक्के प्रचार केला नाही, मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची खदखद, तर कार्यकर्ते मनापासून झटले, उन्नीस-बीस होऊ शकतं, उमेश पाटील यांची प्रतिक्रिया
रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी दबावाला बळी न पडता कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश, तर आरोपीला प्रौढ ठरवण्याचा आणि रिमांड होमचा अर्ज कोर्टाने फेटाळला, अमितेश कुमार यांची माहिती
पोर्शे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना धमक्या, मात्र नातेवाईकांकडून अद्याप तक्रार नाही, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती, तर आरोपी मुलाच्या वडिलांसह आतापर्यंत ७ जणांना अटक
राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के निकाल, कोकण विभाग अव्वल तर छत्रपती संभाजीनगरमधील रेणुका बोरमणीकरला १०० टक्के गुण
नागपुरात खोट्या कागदपत्रांद्वारे आरटीई अंतर्गत नामांकित शाळांमध्ये प्रवेश, एका पालकाला बेड्या तर १९ पालकांविरोधात गुन्हा दाखल
मराठवाड्यात जलसाठ्यांनी तळ गाठला, हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड
आचारसंहितेचे नियम शिथिल करुन चारा उपलब्ध करुन द्या, अंबादास दानवेंची मागणी, तर अनेक जिल्ह्यात ४५ दिवस पुरेल एवढा चारा, मंत्री विखे पाटलांचा दावा
स्तनपान करताना गॅलरीतून पडलेली सात महिन्यांची चिमुकली सुदैवाने बचावली, पण ट्रोलिंगमुळे आईने जीव दिला, चेन्नईतील हृदय हेलावणारी घटना