एक्स्प्लोर
Advertisement
Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Budget) आज मांडला. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी विविध घोषणा केल्या आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. जाणून घेऊयात या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं? त्याबाबतची माहिती.
शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा?
- नैसर्गिक आपत्तीमुळं झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी जुलै, 2022पासून 15 हजार 245 कोटी 76 लाख रुपयांची मदत
- नोव्हेंबर - डिसेंबर, 2023 मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या 24 लाख 47 हजार शेतकऱ्यांना 2 हजार 253 कोटी रुपयांची मदत
- नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टर करुन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने मदत
- खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1 हजार 21 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू
- नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी ई-पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यात लागू
- ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत एकूण 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान
- ‘एक रुपयात पीक विमा योजने’ अंतर्गत 59 लाख 57 हजार शेतकऱ्यांना 3 हजार 504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा
- ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’ अंतर्गत 2 हजार 694 शेतकरी कुटुंबांना 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप
- ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14 लाख 33 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम
- म्हणून 5 हजार 190 कोटी रुपये अदा केले, उर्वरित रकमेचे वाटप त्वरीत
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा 6 हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांत राबविण्यात येणार
- मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत 1 हजार 561 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या ७६७ उपप्रकल्पांना मंजूरी- सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना लाभ
- विदर्भ आणि मराठवाडयातील 14 विपत्तीग्रस्त जिल्हयातील केशरी शिधापत्रिकाधारक 11 लाख 85 हजार शेतकरी लाभार्थींना मे 2024 अखेर 113 कोटी 36 लाख रुपये थेट रोख रक्कम अदा
- राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात 2 लाख 14 हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 1 हजार 239 कोटी रुपये अनुदान
- ‘गाव तिथं गोदाम’ या नवीन योजनेत पहिल्या टप्प्यात 100 नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती
राजकारण
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही
Sada Sarvankar BJP Support : माहिममध्ये भाजपकडून सदा सरवणकरांचा प्रचार #abpमाझा
Sanjay Raut PC : गुजरातचे मंत्री ढोकळे, फाफडा घेऊन आले का? संजय राऊत कडाडले
Nitin Gadkari : शरद पवारच मविआचे खरे रिंगमास्टर, त्यांच्यामुळेच डोलारा टिकून, नितीन गडकरींचं वक्तव्य
Narendra Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेचं कौतुक करुन दाखवावं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement