Sambhaji Raje In Beed : संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून बीडमध्ये अतिवृष्टीची पाहणी
Sambhaji Raje In Beed : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज बीड जिल्ह्यातल्या अतिवृष्टीची पाहणी करून जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांची भेट घेतली आहे.. खासदार संभाजीराजे हे पावसामुळे पडलेले सोयाबीन घेऊन जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात दाखल झाले होते यावेळी त्यांनी दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.. गेल्या चार दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं थैमान घातला आहे तरीदेखील अद्याप एकही मंत्री आणि बीडचे पालकमंत्री हे नुकसान पाण्यासाठी बीड जिल्ह्यात आले नाहीत यावर संभाजी राजे यांना विचारल असता नुकसान पाहणी साठी यावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र मी राजवाडे सोडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहे अस संभाजी राजे म्हणाले आहेत..
















