Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं, कोकाटेंना मिळणार क्रिडा खात्याची जबाबदारी
Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं, कोकाटेंना मिळणार क्रिडा खात्याची जबाबदारी
मुंबई : विधानसभेत रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषिखाते बदलण्यात आलं आहे. कृषिखात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर भरणे यांच्याकडे आधी असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत होते. त्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी पोस्ट केला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव टाकला होता. परंतु कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आला आहे.
दत्तात्रय भरणे कृषिमंत्री
माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलाची चर्चा सुरू होती. आता त्यांच्याकडील खाते हे दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आलं आहे.
माणिकराव कोकाटे यांनी या आधीही शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यं केली होती. ती त्यांना भोवण्याची चिन्हं होती. पण सध्या तरी त्यांचे फक्त खाते बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.





















