CM Ekanth Shinde on Shivaji Maharaj : शिवरायांची एकदाच काय, 100 वेळा माफी मागायला तयार : एकनाथ शिंदे
छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, एकदा नाही तर १०० वेळा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर माफी मागायला मी तयार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री म्हणाले, काल एक महत्त्वाची बैठक आपल्या सिंधुदुर्गातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटना विषयावर होती . झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मनाला अतिशय दुःख देणारी आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. आणि नेवी ने जो कार्यक्रम सहा महिन्यापूर्वी तिथे घेतला होता, तो पण एक चांगल्या भावनेने त्यांनी कार्यक्रम घेतला, त्याच उद्घाटन झालं, लोकार्पण झालं, परंतु दुर्दैवाने तो शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो दुर्घटनाग्रस्त झाला. लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहिला पाहिजे, ही भावना जनसामान्यांची आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची आहे