(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress Strike : "डरो मत" अशा आशयाचे बॅनर लावून काँग्रेसचं नागपुरात सत्याग्रह आंदोलन
Congress Strike : राहुल गांधी अडाणींचा खोटेपणा उघड करतील, या भीतीनेच भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई केली.. एलआयसी आणि बँकांचा पैसा अडाणीच्या घशात जात असताना भाजप आणि संघ का गप्प राहिले असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे... ते नागपूरातील संविधान चौकावर काँग्रेस पक्षाच्या सत्याग्रह आंदोलनात बोलत होते.. मोदी नावाच्या एका गाव गुंडासंदर्भात मी पण बोललो होतो.. एका गावगुंडाचे नाव मोदी असेल.. निरव मोदी आणि ललित मोदी सारख्या चोर डाकुचे नाव मोदी असेल, तर नरेंद्र मोदी आणि भाजपवाल्यांना राग का येतो असाही सवाल ही नाना पटोले यांनी विचारला आहे.. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसने हे सत्याग्रह आंदोलन सुरू केले असून महात्मा गांधींची छोटी प्रतिमा समोर ठेवून "डरो मत" अशा आशयाचे बॅनर लावून काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नागपुरात सत्याग्रह आंदोलन करणार आहे..