New Delhi : PM Modi यांच्या उपस्थितीत दिल्लीत नीती आयोगाची बैठक, CM EKnath Shinde देखील उपस्थित
CM Eknath Shinde : शासकीय कामांच्या बैठकांसाठी मी दिल्लीत आलो आहे. दौऱ्याचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा अर्था अर्थी काही संबंध नसल्याचे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज एक बैठक आयोजीत केली आहे. त्या बैठकील मी उपस्थित राहणार आहे. तसेच उद्या निती आयोगाची बैठक होणार आहे. ती दरवर्षी होते. या दोन्ही महत्वाच्या बैठकांसाठी मी आलो असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.




















