(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Parab On Rahul Narwekar : शिवसेनेच्या घटनेची प्रत दिली नाही हा दावा चुकीचा : अनिल परब
बातमी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माझा कट्ट्या'वर केलेल्या सर्वात मोठ्या गौप्यस्फोटांची. शिवसेनेने २०१८ ची घटना निवडणूक आयोगाकडे सादर न केल्याचा ठपका विधानसभा अध्यक्षांनी बुधवारी आमदार अपात्रतेसंदर्भात दिलेल्या निकालावेळी ठेवला होता. त्याचं खंडन शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलंय. आपल्या पक्षाने वेळोवेळी म्हणजे २०१३, २०१८ आणि नंतरही घटनेची प्रत ही आयोगाकडे सोपवली असल्याचा दावा अनिल परब यांनी केलाय. 'माझा कट्ट्या'वर बोलताना त्यांनी ही बाब अधोेरेखित करुन दाखवली आणि त्याकरता त्यांच्याकडे असलेली पोचपावतीची प्रतही एबीपी माझाला दाखवली. यामध्ये निवडणूक आयोगाच्या संबंधित विभागाची सही आणि शिक्का असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याच आधारे आपण सुप्रीम कोर्टात लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पक्षाच्या ज्या घटनेच्या आधारे आपल्याला निर्णय द्यायचाय, त्या घटनेची प्रतच ठाकरेंनी सादर केल्याचा ठपका विधानसभा अध्यक्षांनी ठेवला होता. त्यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी स्पष्टीकरण देताना हे दावे केलेत.