![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ajit Pawar Full PC : लाडकी बहिण योजनेवर मी आक्षेप घेतला नव्हता : अजित पवार : ABP Majha
नाशिक : महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Lakdi Bahin Yojna) घोषणा केली. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. राज्यातील तब्बल 2 कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरु शकतात. शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) या योजनेचा सध्या प्रचंड गाजावाजा केला जात आहे. मात्र,या योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत योजना पास करण्याच्या आधी अर्थ विभागाने यावर आक्षेप नोंदवल्याची चर्चा होती. याबाबत आता अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी दहावा अर्थसंकल्प सादर केला. माझ्यावर दोन दिवस टीका झाली. अर्थ संकल्प मांडताना निधी नाही, अशी टीका झाली. लाडकी बहिण योजनेला माझा आक्षेप नव्हता. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन लोकांमध्ये गैरसमज निर्माण करायचा. हा चुनावी जमला आहे, असे म्हणण्यात आले. मात्र, ऑगस्ट महिन्यात दोन महिन्याचे पैसे महिलांना मिळतील. गरीब वर्गाला कशी मदत करता येईल, हाच प्रयत्न आम्ही केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार 30 वर्ष राजकारणात
काही राजकीय लोकांनी स्टेटमेंट केले आहे की, अजित पवारांनी मधल्या काळात जो निर्णय घेतला. त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे. हे बदनामी करण्याचे काम चालले आहे. हे धादांत खोटे आहे. अजित पवार 30 वर्ष राजकारणात आहे. एखाद्याने नाव बदलून जाणे हा गुन्हा आहे. कोण बहुरूपी म्हणते लाज लज्जा शरम वाटली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
...तर राजकारणातून निवृत्त होईल
काही जण मला भेटणार होते. मी सांगितले बनकर यांच्याकडे या. त्यात सकाळचा भोंगा वाजतो त्याने काही बोलले. तुम्हाला माझ्या बाबतीत कुठे पुरावा मिळाला. मास्क घालून गेले मिशा लावल्या असे बोलले. सिद्ध झाले तर राजकारणातून निवृत्त होईल, असे थेट आव्हान त्यांनी सुप्रिया सुळे यांना दिले आहे. मी खरतर बोलणार नव्हतो, आम्ही गोर गरिबांसाठी काम करतोय. योजनेच्या बाबतीत माहिती देणार होतो. जनतेनं आम्हाला आशीर्वाद द्यावा. शिवशाहीच्या विचारांनी आम्ही काम करतोय, असे त्यांनी म्हटले आहे.
![Jitendra Awhad on Parbhani : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी अद्याप कारवाई नाही, आव्हाडांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/16/47347e27fca69c8f5526cec945d9eda71734361598553718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Chhagan bhujbal : हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकसाठी रवाना, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याची भेट घेणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/16/e1a8c37936cd8baa2f339e762837c5451734360856039718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar Full PC : विस्तार झाला पण खाते वाटप लांबणीवर,अजित पवार यांनी सगळंच सांगितलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/58d03cac638e6683965438adbe44ca231734282438762718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Cabinet Expansion:फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेचे हे 'मंत्री' मंत्रिमंडळात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/0db4a1974e5f20980bfaf163560c2f4f1734279084973718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Cabinet Expansion : महायुतीचा शपथविधी, राष्ट्रवादीचे 9 मंत्री नव्या मंत्रिमंडळात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/15/688620ce18cde357eec51299c0cdb1af1734277641630718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)