(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 05 PM : 14 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
खासदारकीची इच्छा आहेच, म्हणूनच नाशिकमधून लढायला तयार होतो, भुजबळांचं वक्तव्य, एक महिना उलटूनही निर्णय न झाल्याने माघार, भुजबळांची प्रतिक्रिया
पक्षात कोणी नाराज नाही.... भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण...तर ऑर्गनायझरमधील लेखावर बोलणं टाळलं
पुण्यात खासदार निलेश लंकेंनी घेतली गुंड गजा मारणेची भेट, तर गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नव्हती, भेटीवर निलेश लंकेंचं स्पष्टीकरण
फडणवीसांनी व्हिलन म्हणणाऱ्या राऊतांवर भाजपचा पलटवार...राऊत राजकारणातले जोकर, नितेश राणेंचा प्रहार...तर फडणवीसांचं नेतृत्व सूर्यासारखं, बावनकुळेंचं उत्तर...
संघाने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार १५ मिनिंटही टिकणार नाही, राऊतांचं वक्तव्य, फडणवीसांनी राज्यात राजकीय अंडरवर्ल्ड गँग बनवली, राऊतांची टीका
शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांना क्लिनचीटला अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला हजारे देणार आव्हान, याचिका दाखल करण्यास हजारेंना कोर्टाने दिला वेळ
राज ठाकरे जुलै महिन्यात राज्याचा दौरा करणार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन आणि निवडणुकीची तयारीसंदर्भात राज ठाकरेंचा दौरा
२७ जून ते १३ जुलै राज्याचं पावसाळी अधिवेशन..विधीमंडळ बैठकीत निर्णय तर विरोधकांकडून अधिवेशनाची मुदत वाढवण्याची मागणी
नागपूर स्फोटातील मृकांच्या कुटुंबियांनी नागपूर-अमरावती रोखला, तात्काळ मदत मिळावी कुटुंबियांची मागणी
उज्जैनमध्ये ९ सट्टेबाजांना अटक, १० कोटींची रोख रक्कम जप्त, वर्ल्डकपच्या सामन्यांवर लावत होते सट्टा
कॅलिफोर्नियात पीएनजी ज्वेलर्सवर दरोडा, २ मिनिटांत २० दरोडेखोरांनी ज्वेलर्स लुटलं, पाच जणांना बेड्या