Uddhav Thackeray Nashik Speech : ... तर आम्हाला भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल - उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Nashik Speech : ... तर आम्हाला भाजपमुक्त श्रीराम करावा लागेल - उद्धव ठाकरे श्रीराममंदिरात (Ram Mandir) प्रतिष्ठापना झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati shivaji maharaj) आठवण राममंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी काढली. त्यावर आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) प्रत्युत्तर दिले आहे. शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर झाले नसते. काल कोणीतरी म्हणाले छत्रपती म्हणजे आपले पंतप्रधान... मात्र पंतप्रधनांची तुलना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांशी कधीच होऊ शकत नाही. छत्रपती होते म्हणून आज राम मंदिर उभे झाले, अशी प्रतिक्रया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. ते नाशिकमध्ये अधिवेशनात बोलत होते. कालचा इव्हेंट झाला आता राम की बात करे,वारसे हक्काने हे शिवसैनिक मिळाले आहेत. चोरून मला मिळाले नाहीत. मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून मी प्रचार केला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.