Nashik Infant Death : प्रसुतीवेळी बाळाचा खाली पडून मृत्यू? कुटुंबीयांकडून डॉक्टरांवर गंभीर आरोप!
नाशिकच्या आडगाव परिसरातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालक दगावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मराठा विद्याप्रसारक समाज रुग्णालय आणि महाविद्यालयातल्या घटनेनं खळबळ उडली आहे. सोमवारी २ ऑक्टोबर रोजी सुट्टीच्या दिवशी सकाळी जेलरोड परिसरात राहणाऱ्या फाल्गुनी जाधव महिलेला प्रसूतीसाठी मराठा विद्याप्रसारक समाज रुग्णालय आणि महाविद्यालयात नातेवाईकांनी दाखल केलं होतं. संध्याकाळी महिलेची प्रसूती झाली मात्र बाळ वाचू शकले नाही. दरम्यान प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ खाली पडून जखमी झाल्याने बाळाचा मृत्यू झाला, तसचं शस्त्रक्रियेनंतर दोन तास आम्हाला काहीही माहिती देण्यात आली, उपचाराबाबत कुठलीही कागदपत्रं दाखवण्यात आली नाहीत, गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर माझी नॉर्मल डिलिव्हरी असल्यानं भूल दिली नव्हती, बाळ बाहेर निघालं पण समोरच्या डॉक्टरला ते पकडता न आल्यानं खाली पडल्याचा दावा संबंधित महिलेनं एबीपी माझाशी बोलताना केला आहे. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
![Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/c33dd45b4a63158f6b635dc1d8eb5065173786231772690_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/7de2d29607d17219e2e6183794c93da81736568516530718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/30/c077214dff91c8c17025ce0d123e56f31735548066382719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/25/bc090fa43c9fe82779de79e16b641bda173514980056490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/17/e19df7191cf4b70403118121a0bb13dc1734411295177719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)