(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Flood : नाशिकमध्ये पूरस्थिती कायम; दुतोंड्या मारूतीच्या छातीपर्यंत पाणी
Nashik Flood : नाशिकमध्ये पूरस्थिती कायम; दुतोंड्या मारूतीच्या छातीपर्यंत पाणी
सध्या पुणे जिल्ह्याला आलेल्या जोरदार पावसामूळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. दिंडोरीतील पुणेगाव धरण 80 टक्के भरले आहे. या धरणातून 300 क्युसेक्सने नदीपात्रांत पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सध्या जोरदार पाऊस होत आहे. पुणेगाव धरणातून सोडण्यात आलेले पाणी आता ओझरखेड धरणात पोहोचत आहे. एकूणच दिंडोरी तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे वाघाड, तिसगाव, पालखेड ही धरणे ' ओव्हरफ्लो ' होण्याच्या मार्गावर आहे. गोदावरी नदी दुथडी भरून नाशिक जिल्ह्यातील गोदावरीची पूरस्थिती कायम आहे. सध्या येतील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलेले आहे. गोदा काठावरील इतर मंदिरांना पाण्याने वेढा घातलाय. गंगापूर धरणातून 8 हजार 100 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावारीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.