Nagpur: दोघींच्या संसाराचा 'रिंग कमिटमेंट सेरेमनी' ABP Majha
सामाजिक बंधन झुगारून नागपुरात एक आगळावेगळा रिंग कमिटमेंट सेरेमनी अर्थात साक्षगंध पार पडला. एकत्र संसार करायचा निश्चय केलेल्या दोन मैत्रिणींनी मित्रपरिवाराच्या उपस्थितीत अगदी थाटामाटात हा सोहळा आयोजित केला होता. नागपुरात डॉक्टर सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी या दोघींची ही गोष्ट आहे. लवकरच त्या सिविल सेरेमनी म्हणजेच लग्नही करणार आहेत. एकमेकींच्या प्रेमाचा स्वीकार करून ते वास्तव इतरांनाही स्वीकारायला लावणाऱ्या, आणि पुढे कायद्याचं आव्हान स्वीकारायची हिंमत दाखवणाऱ्या या दोन उच्चशिक्षित मुलींनी नवं आयुष्य सुरु करायचं ठरवलं आहे...... त्यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी....























