Nagpur Monsoon : महाराष्ट्रातील तोतलाडोह धरण फुल्ल, नवेगाव खैरी धरणाचे 16 दरवाजे उघडले
मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील तोतलाडोह धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असून तोतलाडोह धरणातून त्याच्या खालच्या टप्प्यात असलेल्या नवेगाव खैरी धरणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे... परिणामी नवेगाव खैरी धरणातील सर्व 16 दार दीड मीटरने उघडण्यात आले आहे... त्यामुळे कन्हान नदीच्या पात्रात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे... त्यामुळे कन्हान नदीतील नागपूर महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग स्टेशन कालपासून बंद करण्यात आले आहे...
त्यामुळे नागपुरातील अनेक क्षेत्रातील पाणी पुरवठा बाधित झाला आहे..
आशी नगर, सतरंजीपुरा, नेहरूनगर, आणि लकडगंज परिसरात महानगरपालिकेचा पाणीपुरवठा बाधित झाला आहे.. महापालिकेसाठी पाणीपुरवठा ची जबाबदारी सांभाळणाऱ्या ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स कंपनी नुसार या क्षेत्रातील पाणीपुरवठा किमान 48 तास बाधित राहण्याची शक्यता आहे...
नागपूर आणि परिसरात मोठा पाऊस होत नसतानाही मध्य प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाचा हा परिणाम आहे...