ABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP Majha
ABP Majha Headlines : 4 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : Maharashtra News : ABP Majha
वाल्मिक कराडला मकोका खटल्यातही न्यायलयीन कोठडी, सीआयडीची चौकशी पूर्ण झाल्याने कोर्टाचा निर्णय, जेलमध्ये मिळणार सीपॅप मशिन वापरण्याची सुविधा
वाल्मिक कराड, त्याचे साथीदार आणि पोलीस एकत्र असल्याचं सीसीटीव्ही फूटेज एसआयटीच्या ताब्यात, पोलिसच सराईत गुन्हेगारांसोबत मिटिंग घेत असतील तर समाजाने काय बोध घ्यावा, धनंजय देशमुखांचा सवाल
देशमुखांची हत्या झाल्यावर पंकजा मुंडेंचा एकदाच व्हिडीओ कॉल... न्याय देऊनच भेटायला येण्याचं संतोष देशमुखांच्या पत्नीचं संभाषण तर धनंजय मुंडेंचा एकदाही फोन आला नसल्याची तक्रार
सरपंच देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळे मोस्ट वॉन्डेड म्हणून जाहीर, अनेक दिवसांच्या शोधानंतरही आरोपी न सापडल्याने फरार घोषित, ठावठिकाणा सांगणाऱ्यास मिळणार बक्षीस
अभिनेता सैफच्या रिकव्हरीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांचे सवाल, तीक्ष्ण शस्त्राची जखम आणि सहा तासांच्या ऑपरेशननंतर फक्त पाच दिवसात एवढा फिटनेस कसा, एक्स पोस्टद्वारे शंका
ठाकरेंचे चार आमदार आणि तीन खासदार शिंदेना भेटल्याचा उदय सामंतांचा दावा, तर उद्योगमंत्र्यांना दावोसमधल्या गुंतवणुकीपेक्षा फोडाफोडीची माहिती, त्यांना मुंबईला पाठवा, संजय राऊताचं प्रत्युत्तर