Maharashtra Karnataka Border Dispute :कर्नाटकविरोधात विधानसभेत ठराव एकमताने संमत Winter Session 2022
Maharashtra Karnataka Border Dispute: कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंचन् इंच जागा महाराष्ट्राचीच असून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे असल्याचा ठरावा आज विधानसभेत एकमताने मंजूर (Maharashtra Assembly Winter Session Resolution) करण्यात आला. महाराष्ट्राच्या विधानसभेत अखेर बेळगाव सीमा प्रश्नी ठराव (Belgaum) एकमताने मंजूर करण्यात आला. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने बेळगाव सीमा प्रश्नावर ठराव करण्याची मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्राच्या विधानसभेने कर्नाटक प्रशासनाच्या मराठीविरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध केला.























