एक्स्प्लोर
No Corona Death : मुंबईत काल 'शून्य' कोरोना मृत्यू, यावर्षीची दिवाळी निर्बंधमुक्त साजरी होणार?
Mumbai Corona Update : देशासह राज्यातीलही कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावताना पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारी यामागील प्रमुख कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काल (रविवारी) राज्यात 1 हजार 715 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद (Coronavirus) झाली. तर 2 हजार 680 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, काल देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच संपूर्ण राज्याचा विचार केला तर तुलनेनं मुंबई शहरात सर्वाधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद केली जात होती. अशातच कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत पहिल्यांदाच मुंबईत कोरोनाची झीरो डेथ नोंदवण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement