Shrikant Shinde vs Ravindra Chavan : युतीत नाराजी अजूनही कायम? भूमिपूजनाला रविंद्र चव्हाण गैरहजर
गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत भाजप आणि शिंदे गटात वाद पाहायला मिळतोय.. भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात वाद असल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यातच आज कल्याणमध्ये लोकग्राम पादचारी पुलाच्या भूमिपूजनाला श्रीकांत शिंदे उपस्थित होते मात्र रवींद्र चव्हाण अनुपस्थित असल्यानं अजूनही वाद मिटला नसल्याची चर्चा सुरु झाल्या..वादाबद्दल श्रीकांत शिंदेंना विचारलं असता युतीत सर्वकाही आलबेल आहे. रवींद्र चव्हाणांचे वेगळे कार्यक्रम असल्यानं ते अनुपस्थित होते अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली तर आम्हाला ज्या सूचना केल्या आहेत त्याच पालन आम्ही करतोय असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या





















