Mumbai : गुगलवर शोधत होता जीवन संपवण्याचे उपाय, पोलिसांनी वाचवले प्राण
आजकाल आयुष्यात कोणताही अडचण आली तरी मित्र, नातेवाईक अथवा कुटुंबियांशी न बोलता प्रत्येकजण गूगलला विचारत असतो. गूगलकडून प्रत्येक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबईतील एका तरुणानं आत्महत्या कशी करायची? असं गूगलवर सर्च केलं.. त्यानंतर थेट अमेरिकेतून मुंबई पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्याच आधारावर मुंबई पोलिसांनी त्या तरुणाचा जीव वाचवला. शिवाय, त्याचं समुपदेशन करत आत्महत्येचा विचार मनातू काढून टाकलाय. सदर तरुण हा आय टी इंजीनिअर असून तो गेल्या काही दिवसांपासून कर्जाच्या टेंशनमध्ये होता..त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला. गुगलवर आत्महत्येसंदर्भात सर्च करताच यूएस, एनसीबी इंटरपोल वॉशिंगटनने नवी दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी या तरुणाचे प्राण वाचवलेत..मुलाचा जीव वाचल्याने त्याच्या आई वडीलांनी पोलिसांचे आभार मानलेत.